logo

एका प्रवाशाचे तिकीट लाखांच्या घरात! भारतातील सर्वात महागडी ट्रेन, राजेशाही थाट पाहून डोळे दिपतील......

India Most Expensive Train: भारतात रेल्वेतून फिरण्याचीदेखील एक वेगळीच मजा आहे. ट्रेनचा प्रवास स्वस्त आणि आरामदायक म्हणून मानला जातो. भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. रेल्वेचे तिकीट कमी असल्याकारणाने नागरिकांची पहिली पसंत ही रेल्वे असते. तसंच, स्लीपर व एसी कोचने आरामदायी प्रवासदेखील होतो. पण तुम्हाला माहितीये का भारतात अशी एक ट्रेन आहे ज्यातून प्रवास करणे म्हणजे एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्यासारखेच आहे. या ट्रेनचे नाव महाराजा एक्स्प्रेस असून ही फक्त ट्रेन नसून चालते-फिरते हॉटेल आहे. 
महाराजा एक्स्प्रेस भारतातील सर्वात महागडी आणि लक्झरी ट्रेन मानली जाते. या ट्रेनची सुरुवात 2010मध्ये इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन (IRCTC)ने केली होती. याचा उद्देश म्हणजे परदेशी पर्यटकांना भारतातील शाही जीवन समजावे आणि त्याचा त्यांना अनुभव घेता यावा. 
महाराजा एक्सप्रेसचा इंटिरियर पाहूनच तुम्ही म्हणाल की हा एखाद्या राजा-महाराजाचा महल आहे. यात रॉयल सुट्स, डिलक्स केबिन, स्पेशल डायनिंग कार, बार कार सारख्या सुविधा आहेत. प्रत्येक केबिनमध्ये प्रायव्हेट बाथरूम, एलसीडी टिव्ही, इंटरनेट कनेक्शन आणि पर्सनल अटेंडेंट सारख्या सुविधा दिल्या जातात. महाराजा एक्स्प्रेस वेगवेगळ्या मार्गांवर धावते. मुख्य मार्गांवर हेरिटेज ऑफ इंडिया, इंडियन स्पेंडर, ट्रेजर ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. ही ट्रेन दिल्ली, आग्रा, जयपुर, उदयपूर, जोझपुर, वाराणसी आणि मुंबईसारख्या ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांचा समावेश आहे. प्रवाशांचे राजेशाही थाटात स्वागत केले जाते. गाइडेट टूर, शाही भोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्याची संधी मिळते. 

किती आहे भाडे?

महाराजा एक्स्प्रेसमध्ये एका व्यक्तीचे भाडे 3 लाख ते 19 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. हे भाडे प्रवाशांचे पॅकेज, केबिन टाइप आणि प्रवासाचे दिवस यानुसार भाडे ठरवले जाते. सगळ्यात महागडे पॅकेज प्रेसिडेंशियल सुइटचे असते. ज्यात प्रवाशांना पूर्णपणे शाही अनुभव मिळतो. 
महाराजा एक्स्प्रेस आशियातील सर्वात लीडिंग लग्जरी ट्रेन आणि वर्ल्ड्स लिडिंग लग्जरी ट्रेन यासारखे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. याची सेवा, सुविधा आणि राजेशाही अनुभव यामुळं ही ट्रेन इतर ट्रेनपेक्षा वेगळी आहे. 

69
5436 views