logo

संत गजानन महाराज मंदिरात गोकुळाष्टमीचा भक्ती-आनंदसोहळा

संत गजानन महाराज मंदिरात गोकुळाष्टमीचा भक्ती-आनंदसोहळा

अमळनेर प्रतिनिधी –
दादासाहेब जी.एम. सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात गोकुळाष्टमीचा पवित्र सोहळा भक्तीभाव, आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने गजानन महिला भगिनींनी श्रीकृष्णासाठी विविध फुलांनी सजवलेला सुंदर पाळणा मंदिरात ठेवला होता. हा पाळणा आकर्षणाचे केंद्र ठरला. महिलावारी प्रमुख सौ. ज्योतीताई पवार यांच्या नेतृत्वाखाली गजानन महिला भगिनींनी श्रीकृष्णाच्या गोड भजनांचा गजर करत आनंदोत्सव साजरा केला. भजनांच्या तालावर महिलांनी नृत्य करून उत्सवात रंग भरले.
यावेळी सर्व महिला भगिनींनी आपापल्या घरातून प्रेमाने बनवलेले विविध पदार्थ आणून श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण केला. भक्तीभावाने सजलेला हा सोहळा पाहून वातावरणात एक वेगळीच दिव्यता जाणवत होती.
गजानन परिवारातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून "जय कान्हैया लाल की" च्या घोषणांनी वातावरण गोकुळातल्या उत्सवाप्रमाणे दुमदुमून गेले. गोकुळाष्टमीचा हा सोहळा भक्ती आणि परंपरेचे अनोखे दर्शन घडवणारा ठरला.

29
1374 views