लातूर जिल्ह्यासह अनेक तालुक्यांमध्ये पावसाचे थैमान
नवनाथ डिगोळे प्रतिनिधी
लातूर : दोन दिवसांपासून लातूर जिल्ह्यासह परिसरातील अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे.
अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महत्वाचे निर्देश :
नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे
धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे
पावसाचा जोर वाढत असल्याने बचाव पथके सतर्क असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.