logo

पत्रकार संग्राम वाघमारे यांना साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार जाहीर

नवनाथ डिगोळे प्रतिनिधी

चाकूर,
येथील ज्येष्ठ पत्रकार संग्राम वाघमारे यांना ए.डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य तर्फे देण्यात येणारा साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे.

पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांनी कळविले. एक आदर्श पत्रकार म्हणून वाघमारे यांनी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव संघर्ष केला आहे.

हा पुरस्कार २३ ऑगस्ट रोजी सांगली येथील हरिप्रिया मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित भव्य सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

यापूर्वीही पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल वाघमारे यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तथापि, डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने दिला जाणारा हा जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या कार्याला मोठा सन्मान आणि प्रेरणा देणारा ठरणार आहे.

साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबाबत सर्वत्र आनंद व्यक्त होत असून, विविध स्तरांतून वाघमारे यांचे अभिनंदन होत आहे.

4
1558 views