logo

'ठरलं तर मग' फेम पूर्णा आजींनी घेतला जगाचा निरोप, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या 68 व्या वर्षी निधन......

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांचं पुण्याच्या राहत्या घरी निधन झालं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. निधनाचे मुख्य कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानगृहात अंत्यसंस्कार पार पडणार आहे.

ज्योती चांदेकर यांच्या पश्चात दोन मुली आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडीत ही मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय नाव.

150
8348 views