
अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
पिंपरी, प्रतिनिधी : निवासी संपादक उमेश पाटील
जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दहावी व बारावीमध्ये प्रथम आलेल्या सायली सात्रस, वेदिका सिद्धवगोल, बुह्रानुद्दीन दलाल, शेहजाद शेख या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच दहावी-बारावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरवही करण्यात आला.
प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, प्रदीप सातरस, अनंत सिद्धवगोल, विणा सिद्धवगोल, कौसर शेख, युसुफ दलाल, लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका इशिता परमार, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका सीमा हवालदार, पर्यवेक्षिका प्रीती पाटील, भटू शिंदे, उदय फडतरे, अक्षय नाईक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.
इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीते सादर केली.
अध्यक्षा आरती राव यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व सांगत भारताचे भविष्य आणखी उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. सचिव प्रणव राव यांनी भारताचा तिरंगा ध्वज व त्याचे महत्त्व स्पष्ट करीत स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानाविषयी माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना एकतेचे महत्त्व सांगत एकतेच्या जोरावर भारताला इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त केले, असे सांगितले.
सूत्रसंचालन पर्यवेक्षिका सीमा हवालदार यांनी, तर आभार शिक्षिका शिल्पा पालकर यांनी मानले.