logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

झोला येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा. गंगाखेड. तालुक्यातील मौजे झोला येथे बौद्ध विहारावर प्रतिवर्षाप्रमाणे

झोला येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

गंगाखेड. तालुक्यातील मौजे झोला येथे बौद्ध विहारावर प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
झोला गावच्या सरपंच सौ. वृशाली प्रताप मुरकुटे यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सुभाष चंद्रबोस,चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच वृशाली मुरकुटे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
झोला येथे सन 2014 साली तत्कालीन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष यशवंत मस्के सर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन शाखाध्यक्ष प्रेम सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने बौद्ध विहरावरच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
तेव्हा पासून हा रुबाबदार देखणा असा कार्यक्रम झोला येथील बौद्ध विहारावर
दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
याहीवर्षी भारतीय बौद्ध महासभा व ऑल इंडिया पँथर सेना शाखा झोला यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास झोला नगरीच्या सरपंच सौ.वृषाली मुरकुटे यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सभासद,प्रताप मुरकुटे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,संत भगवान बाबा मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी,डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष धनंजय भेंडेकर,ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी,भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक माणिकराव नागरगोजे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद,शालेय विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिक व बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

167
17227 views
2 shares

Comment