logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयास आ. महेन्द्रशेठ दळवी य़ांच्या शीफारसिने आर.सी.एफ. थळ य़ांच्या वतिने 15 लाख रूपये सी. एस

अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयास आ. महेन्द्रशेठ दळवी य़ांच्या शीफारसिने आर.सी.एफ. थळ य़ांच्या वतिने 15 लाख रूपये सी. एस. आर निधी मंजुर
अंजुमन इस्लाम जंजिरा ही ऐक जुनी शिक्षण संस्था 115 वर्षापासुन शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत आहे. अंजुमन इस्लाम जंजीराच्या मुरूड येथिल शैक्षणिक संकुलात नर्सरी ते पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.
अंजुमन डिग्री कॉलेज ऑफ सायन्स साठी नविन इमारत उभारणी चे काम सुरू करावयाचे आहे. सदर कामासाठी निधी उपलब्ध व्हावा य़ासाठी आर.सी.एफ. थळ येथे सी. एस. आर निधी साठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या सी. एस. आर निधी प्रस्तावास अलीबाग- मुरूड मतदार संघाचे लोकप्रिय तसेच कार्यतत्पर आमदार महेन्द्रशेठ दळवी य़ांच्या वतिने शीफारस करण्यात आली होती.
आज दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजी आर.सी.एफ. थळ सी. एस. आर यूनिट तर्फे 15 लाख रूपये सी. एस. आर निधी मंजुर झालेला धनादेश आमदार महेन्द्रशेठ दळवी य़ांच्या हस्ते सूपूर्द करण्यात आला. धनादेश स्विकारताना आर.सी.एफ. थळ सी. एस. आर यूनिट चे एच.आर श्री. संतोष वजे, अंजुमन इस्लाम जंजिराचे सहसचिव अब्दुलरहिम कबले, खजिनदार अल्ताफ मलिक महाविद्यालयाचे चेअरमन जैनुद्दिन कादरी, प्र. प्राचार्य डॉ. साजिद शेख, प्रा. जावेद खान, शराफत शेख व नासिर कादरी आदी मान्यवर उपस्थित होते.
अंजुमन इस्लाम जंजिरा व महाविद्यालयतर्फे सर्व पदाधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांतर्फे या कामास पूर्णतवास नेल्याबद्दल आमदार महेन्द्रशेठ दळवी व आर.सी.एफ. थळ सी. एस. आर यूनिट यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

134
23737 views

Comment