logo

सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियम 1984 नुसार तुपगाव येथील विजय ठोसर वर गुन्हा दाखल. रसायनी (प्रतिनिधी) : खालापूर ता

सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियम 1984 नुसार तुपगाव येथील विजय ठोसर वर गुन्हा दाखल.


रसायनी (प्रतिनिधी) : खालापूर तालुक्यातील तुपगाव या ठिकाणी सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियम 1984 अन्वये कलम 3 आणि भारतीय दंड संहिता 1860 अन्वये कलम 427 नुसार तुपगाव गावातील विजय ठोसर यांच्या विरुद्ध तुपगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सचिन कुराडे यांनी आज चौक पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला.

सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचाय तुपगाव या ठिकाणी सुस्थितीत असलेले 3 सीटचे सार्वजनिक शौचालय जेसीबी च्या साहाय्याने 22 जून रोजी विना परवानगी तोडले. सदरील प्रकार ग्रामस्थांना कळताच त्यांनी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक याना कळवली . सदर प्रकार घडत असताना तुपगाव ग्रामपंचयात सदस्य निलेश मोरे यांनी आक्षेप घेतला असता हे शौचालय तोडण्याची परवानगी घेतली आहे असे खोटे सांगून शौचालय तोडले. हा प्रकार कळताच ग्रामसेवक यांनी चौक पोलीस स्टेशन येथे कॉल करून तक्रार नोंदवून घेण्यास सांगितले होते. आज (23 जून) सकाळी सदरील शौचालय ची पाहणी करून चौक पोलिस ठाणे येथे विजय ठोसर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
यावेळी पोलीस स्टेशन येथे सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व सदस्या, माजी ग्रामपंचायत सदस्य सदाशिव साळवी, गजानन साळवी, उमेश साळवी, अनिकेत गायकवाड, मधुकर गुरव, गणेश तुळशीदास गुरव, गणेश शंकर गुरव, रौफ खान, सचिन साळवी, प्रमोद सोनवणे संतोष कुंभार, किशोर मोरे, रमेश साळवी व सर्व जागृत नागरिक तूपगाव उपस्थित होते.

0
1648 views