पपई पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव,
पपई पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव,
पपई पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव या कारणामुळे पपई उत्पादक संकटात सापडले आहेत. पपई पिकावर रोग आल्याने उत्पन्न मिळणार नसल्याने हताश झालेल्या ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्याने आपल्या दोन एकरवरील उभ्या पपई पिकावर रोटावेटर फिरवला आहे. शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील शेतकरी मल्हारी संतोष कापडे यांनी आपल्या शेतात पपई रोपांची
लागवड केली होती. रोपांना जगविण्यासाठी रासायनिक खताबरोबर इतर खर्च केला होता. परंतु, पाच महिन्यांनंतर या पपई पिकावर मोझॅक, डावनी, माईट रोगांचा प्रादुर्भाव झाला.