logo

**वंचित बहुजन महिला आघाडी पदाधिकारीमुळेच मातंग 14 वर्षीय पिडीत मुलीला मिळाला न्याय आरोपी अटक व गुन्हे दाखल .*

*अंगावर थरकाप आणणारी अकोला येथील घटना**

*घटनेचा थरकाप दुपारी 4.30 ते रात्री 1.30 वाजेपर्यंत सुरू होता.आरोपी गणेश कुंभरे विरूद्ध भादवी 363, 376, 354, 354ब, 323, 324, 506, 4-8 पोक्सो गुन्हा दाखल*

अकोला... आज दि. 17/11/2023 घडलेली घटना पुढील प्रमाणे.
स्थानिक कैलास टेकडी अकोला येथे एक गरीब कुटुंब राहतो. आई ही मेन्टली डिस्टर्ब आहे. वडील कामावर जातात एक बहीण व एक लहान भाऊ घरी राहत असत. शेजारी राहणारा आदिवासी 29 वर्षीय कुंभरे हा व्यसनाधीन व गुंड प्रवृत्तीच्या असल्याने या 14 वर्षीय मुलीला धमकावून अश्लील चाळे करायचा व या लहान मुलीवर जबरदस्ती करत होता. वडीला त्याला समजावले तरी त्यांना जिवे मारण्याच्या धमकी देत होता. त्यामुळे तक्रार देण्यासाठी घाबरत होते. परंतु 15/11/2023 रोजी विकृत गणेश चंद्रशेखर कुंभरे याने माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडविली. सर्व कामाला व बहीण बाहेर गेल्याने कोणी घरात नसतांना जबरदस्ती करण्यास नकार दिल्याने त्या 14 वर्षीय मुलीला घरातून बाहेर बोलाविले व ओढत ओढत जवळील सिंधी कॅम्प स्मशानभूमीत नेले ती मारले व पुर्णपणे विवस्त्र केले ती रडत होती मला सोडा अशी विनवणी करीत होती तरी गणेश कुंभरे यांने तिच्या हाताला जळत्या शिगारेटचे चटके दिले व मारले हे सर्व प्रकार काही परिसरातील मुलांनी पहिला म्हणून तो तेथून निघून गेला. नंतर पुन्हा दारू पिऊन येऊन घरी जाऊन तिला जबरदस्तीने त्याच्या घरात नेऊन बलात्कार केला व तिचे केस कापले, एवढे नव्हेतर सिंधी कॅम्प मधील सलून मध्ये नेऊन तिचे टक्कल केले. हा सर्व प्रकार संध्याकाळी आई वडिलांना सांगितला पण गरीब कुटुंब असल्याने व मारून टाकण्याची धमकी दिल्याने दोन दिवसांपासून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. परंतु आज दि 17/11/2023/ रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व आदरणीय अंजलीताई आंबेडकर हे अकोला येथे असतांना हे प्रकरण वंचित बहुजन महिला आघाडी प्रदेश महासचिव अरूणधंतीताई शिरसाट यांना माहीत होताच त्यांनी महिला पदाधिकारी यांना माहिती देताच अकोला जिल्हा महिला अध्यक्ष प्रभाताई शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाताई इंगळे, महानगर अध्यक्षा वंदनाताई वासनिक, समाज कल्याण सभापती आम्रपालीताई खंडारे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे , जिल्हा उपाध्यक्ष तथा मातंग समाज नेते गजानन दांडगे, मातंग युवा नेते गणेश सपकाळ, युवक अध्यक्ष आशिष मांगूळकर, मातंग समाज महिला नेत्या सुनंदाताई चांदणे यांनी तात्काळ पोलीस स्टेशन खदान अकोला येथे जाऊन घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार जाधव यांची भेट घेऊन आरोपी गणेश कुंभरे याला जमा करण्यात आले. मानोरा येथील मिटींग आटोपून अरूणधंतीताई शिरसाट हे पोलीस स्टेशनला पोहचल्या व आरोपीला त्वरीत अटक करुन आरोपी गणेश कुंभरे विरूद्ध भादवी 363, 376, 354, 354ब, 323, 324, 506, 4-8 पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा थरकाप दुपारी 4.30 ते रात्री 1.30 वाजेपर्यंत सुरू होता. रात्री मुलीचे मेडीकल करून बालसुधारगृहात रवानगी केली व आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले त्यानंतरच वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशन सोडलं. जर वंचित बहुजन आघाडीने साथ दिली नसती तर सदर मुलीला न्याय मिळाला नसता व सदर प्रकरण दडपणल्या गेले असते. सर्वांनी सजग व निर्भिड राहणे गरजेचे आहे. कोण आपली मदत करतो हे मातंग समाजानेही समजणे गरजेचे आहे आज वंचित पदाधिकारी नसते तर अनर्थ घडला असता असे मत गजानन दांडगे, सुनंदाताई चांदणे, गणेश सपकाळ यांनी व्यक्त केले

0
2096 views