logo

सुपे बारामती येथे अटल भूजल योजना प्रशिक्षण कार्यक्रम!

अटल भुजल योजना (ABHY) ही भारत सरकारने समुदायाच्या सहभागाद्वारे भूजल व्यवस्थापन सुधारण्यासाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट भारतातील, विशेषतः ग्रामीण भागातील गंभीर पाणी टंचाईच्या समस्येचे निराकरण करणे आणि शाश्वत भूजल व्यवस्थापन सुनिश्चित करणे हा आहे.
सुपे तालुका बारामती येथे ननावरे वस्ती जवळ या योजनेबद्दल यशदाच्या हर्षाली दिवेकर यांनी उपस्थित गावकऱ्यांना माहिती व प्रशिक्षण दिले. यावेळी सरपंच तुषार हिरवे,ग्रामपंचायत सदस्य विलास वाघचौरे,शंकर शेंडगे,विशाल चांदगुडे, प्राचार्य अशोक लोणकर,राजेंद्र ननावरे,सुयश जाधव,सुयश जगताप,नाना शेंडगे,पोपट टिळेकर,गणेश शेंडगे,रामदास लोणकर,संदीप होले,प्रतीक जगताप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

125
20965 views