
राष्ट्रीय महामार्गवर वाहनांना जाण्यासाठी बोगदा होत नाही तोपर्यंत कामाला स्थगती द्या.
नवापूर शहराबाहेर करंजी ओवारा ( नया होंडा) लगत राष्ट्रीय महामार्गावर वाहनांना जाण्यासाठी बोगदा होत नाही तोपर्यंत कामाला स्थगती द्या. ३० ते ४० गावातील सरपंच, ग्रामस्थ, वाहनधारकांनी आज तहसीलदारा कडे निवेदन दिले,
बोगदा न झाल्यास महामार्ग बंद करण्याचा इशारा दिला आहे,
राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक ५३ चे काम प्रगतीपथावर सुरु असून अनेक ठिकठिकाणी फ्लायओव्हर रस्ता बनविण्याचे देखील काम सुरु आहे. परंतु, गुजरात व महाराष्ट्राचे एकूण ३० ते ४० गावे तसेच पाड्यातील लोकांच्या सोयी सुविधांचा विचार न करता काम करतांना आम्हाला मार्गक्रमण करण्याकरीता मार्गिकाची व्यवस्था केलेली नसल्याने अडचणीचे होत आहे. नवापूर तालुक्यातील खालील ठिकाणी सुरु असलेल्या रस्त्याच्या कामांत बोगदा करुन मिळावा बाबत संदर्भीय पत्रान्वये विनंती करण्यात आलेली होती. परंतु, याबाबत आजतागायत काहीही कार्यवाही झालेली नसल्याचे निदर्शनास येत आहे. या मार्गावरुन शेकडो विद्यार्थी, कामगार, वाटसरु, रहिवासी याच मार्गाने पायी मार्गक्रमण करतात, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, हॉस्पिटल, इग्लिश मीडियम स्कूल, शासकीय, उच्च प्राथमिक आश्रमशाळा, पर्यटन स्थळ, मंदिरे लोक यांच रस्त्याचा वापर करीत असतात. तसेच या मार्गावरच गुजरात व महाराष्ट्राची सीमा आहे.
यात आम्ही नवापूर तालुक्यातील ३० ते ४० खेड्यावरील नागरिक नवापूर येथे व्यापार, व्यवसाय, वैद्यकीय, शैक्षणिक कामासाठी नेहमीच ये-जा करीत असतो. सदर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असतांना आम्हाला नवापूर येथे येण्यासाठी व परत आमच्या गावाकडे जाणेसाठी मध्यभागी कोठेही बोगदा ठेवलेला नसून केवळ आमच्या गावाकडे जाण्यासाठी डिव्हायडरचा काही भाग सोडून दिलेला असून आम्हाला सदर भागाचा वापर करुन नवापूर शहराकडे येणे व परत जाणे करावे लागत आहे. परंतु, हे भविष्यात धोकादायक असून अपघात होण्याची व जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्या ठिकाणी 10 ते 12 फूट उंचीचा बोगदा करून मिळणेकामी आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करणेत यावे म्हणून तहसीलदाराने निवेदन दिले.
श्री दिलीप गावित, माजी सभापती, श्री यशवंत गावित माजी सरपंच आमपाडा, श्री जालमसिंग गावित काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष नवापूर, श्री राया मावची जिल्हा परिषद सदस्य, श्री लालसिंग गावित पत्रकार, श्री दिनकर गावित सरपंच गडद, श्री सुनील चौधरी सरपंच करंजी खुर्द, श्री पौलुस सायला कुंवर सरपंच झामनझर, श्री गिरीश गावित पोलीस पाटील, श्री राहुल गावित सरपंच बिलमांजरे, श्री चेमा गावित माजी ग्राम पंचायत सदस्य व असंख्य नागरिक उपस्थित होते.