logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जिंतूरात बानुगडे पाटील यांचे व्याख्यान तर स्नेहल पुराणिक यांच्या कौटुंबिक नाटकाचे आयोजन


तालुका मराठी पत्रकार संघाचा उपक्रम.

शहरातील मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार दि ११ जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता प्रा.नितीन बानुगडे पाटील यांचे ह्रदयस्पर्शी व्याख्यान तर शुक्रवार दि.१२ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता स्नेहल पुराणिक निर्मित कौटुंबिक विनोदी नाटकाचे जुनी मूनस्फि मध्ये आयोजन करण्यात आले आहे
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली दि 11 जानेवारी रोजी प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे अंगावर शहारे आणणारे 'चला भविष्यावर बोलू काही' या विषयावरील व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुंदरालाल सावजी बॅंकेचे अध्यक्ष मुकुंद सावजी कळमकर, उद्योजक ब्रिजगोपाल तोष्णीवाल, जेष्ठ विधीज्ञ मनोज सारडा,प्रा श्रीधर भोंबे उपस्थिती राहणार आहे. तर शुक्रवार दि 12 जानेवारी रोजी माजी आ विजय भांबळे यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहल पुराणिक निर्मित 'गंमत असते.... नात्याची' हे विनोदी नाटक होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून कांग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरे, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष रमेश दरगड उपस्थित राहणार आहे. या दोन्ही कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.

128
21557 views

Comment