logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

चंद्रकांत शेटे यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा!

तळेगाव दाभाडे नगरीचे माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते, स्नेहवर्धक मंडळाचे अध्यक्ष व इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा (दि 24) बालविकास विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती स्नेहवर्धक मंडळाचे सचिव किशोर राजस,माजी नगरसेवक अमोल शेटे तसेच आमदार कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार शेलार आदींनी दिली.

तळेगावातील सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील बडे प्रस्थ म्हणून सर्वपरिचित असलेले चंद्रकांत शेटे यांच्या एकूण कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ उद्योजक व इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे व ज्येष्ठ विचारवंत,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ श्रीपाल सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उद्या बुधवार (दि 24) रोजी सायं 5:30 वा. बालविकास विद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा संपन्न होणार आहे.

मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे, गणपतराव काळोखे, गोरखभाऊ काळोखे,डाॅ. सुधाकर ढाकेफाळकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा! दिल्या.

145
2226 views

Comment