logo

Matura Krishna Temple : ''श्रीकृष्ण मंदिराची वास्तू औरंगजेबानेच पाडली'', माहिती अधिकारात समोर आली बाब

मथुराः श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात एक मोठी माहिती पुढे आलेली आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, मुघल सम्राट औरंगजेबाने मथुरेत श्रीकृष्ण मंदिराची वास्तू पाडून मशीद उभारल्याचं पुढे आलेलं आहे. आग्र्याच्या पुरातत्व विभागाने याबाबत माहिती दिली आहे. मैनपुरीचे अजय प्रताप सिंह यांनी देशभरातील मंदिरांच्या संबंधाने माहिती मागवली होती. यामध्ये मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमीची माहिती मागवली होती. याच्या उत्तरात भारतीय पुरातत्व खात्याने ब्रिटीश साम्राज्याच्या काळात प्रकाशित करण्यात आलेल्या राजपत्राचा दाखला दिला आहे. मशिदीच्या जागेवर सुरुवातीला केशवदेव मंदिर होतं. त्या मंदिराची वास्तू पाडून मशिद बांधली गेली, असं सांगण्यात आलंय. 'आज तक'ने हे वृत्त दिले आहे.कृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासाचे अध्यक्ष Adv. महेंद्र प्रताप यांनी सांगितलं की, ब्रिटीश सरकारच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या लोककार्य विभागाच्या इमारत आणि रस्ते सेक्शनच्या वतीने १९२० मध्ये अलाहाबादमध्ये गॅझेट प्रकाशित करण्यात आलेलं होतं. त्यात उत्तर प्रदेशातल्या वेगवेगळ्या भागातील ३९ स्मारकांची माहिती उपलब्ध आहे. या सुचीमध्ये ३७ क्रमांकावर कटरा केशवदेव भूमीवर श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख आहे. टेकडीवर पूर्वी मंदिर होतं, ते पाडून तिथे मशीद उभाल्याची नोंद त्यात आहे.

0
0 views