
सेलू शहरात (ऊबाठा) शिवसेनेच्या तीन शाखेचे अनावर .... :
मिरवणूक काढत वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांचे स्वागत..
सेलू ( वर्धा ) :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सेलू शहरात प्रभाग क्रमांक अकरा , दहा व तीन या शाखेचे अनावर वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ वर्धा विधान सभा संपर्क प्रमुख प्रप्फुल भोसले , हिंगणघाट विधानसभा संपर्क प्रमुख उत्तमजी आयवडे, वर्धा विधानसभा प्रमुख निहाल पांडे,वर्धा जिल्हा महिला संघटिका संपर्क प्रमुख कल्पना ठाकूर, उप जिल्हा संघटीका भारती कोटंबकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकी संधर्भात जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांनी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांची सेलू येथील पक्ष कार्यालयात आढावा बैठक घेतली , यावेळी त्यांनी प्रमुख पदाधिकारी यांना सूचना देत यावेळी वर्धा विधानसभेवर आपला उमेदवार निवडून अनावयाचा आहे असा निर्धार व्यक्त करून दाखवला. पदाधिकारी यांच्या बैठकी नंतर मेडिकल चौक येथून वाजत गाजत मिरवणूक काढत सेलू शहरातील शाखेचे अनावर करण्यात आले . कोलबा स्वामी मठ येथे कार्यकर्त्यांना संबोधन करीत शोटे खानी सभा यावेळी आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील पारसे, तालुका प्रमुख अमर गूंधी, शहर प्रमुख प्रशांत झाडे, तालुका समन्वयक योगेश ईखार, उपशहर प्रमुख पिंटू पराते, पंकज तडस, अतुल काकडे, रवींद्र दुरतकर, गणेश कंडे, आशिष राऊत सुनील तीमांडे, आदी कार्यकर्त्या सहित प्रभाग क्रमांक तीन चे शाखा प्रमुख गणेश माहुरे, प्रभाग क्रमांक अकरा चे शाखा प्रमुख राजू पराते, प्रभाग दहा चे शाखा प्रमुख विठ्ठल दंढारे उपस्थित होते.