logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शुभांगी दळवी यांची जिजामाता कृषिभूषण पुरस्कारासाठी निवड!

तळेगाव दाभाडे, 7 मार्च 24
येथील श्रीहरी हायटेक नर्सरीच्या संचालक शुभांगी पांडुरंग दळवी यांची महाराष्ट्र शासनाच्या जिजामाता कृषिभूषण पुरस्कारा साठी निवड झाली आहे. पुण्याचे विभागीय कृषि सहसंचालक आर. एस. नाईकवाडी यांनी  त्यांच्या प्रकल्पास भेट देत शुभांगी दळवी यांचे अभिनंदन केले. शुभांगी यांनी जिद्दीने केलेली शेती आणि पुरस्कार इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारा असल्याचे ते म्हणाले.

कृषि मंत्रालय विभागाचे उप सचिव एस. बी. कराड यांनी कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृषि पुरस्कारार्थींची नावे जाहीर केली. त्यात यंदाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार जाहीर झालेल्या महिला शेतकरी शुभांगी दळवी या पुणे जिल्ह्यातील एकमेव पुरस्कार्थी आहेत.

शुभांगी यांचे वडील शहाजी, आई जयमाला यांनी तिला पारंपरिक शेतीचे धडे दिले. त्यानंतर राहुरी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, हॉर्टीकल्चर विज्ञान-तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम, परदेशातील शेतीपध्दत जाणून घेण्यासाठी केलेला तैवान देशाचा दौरा यासारखे प्रयत्न सुरू ठेवले. श्रीहरी पॉलीहाऊस नर्सरीतील त्यांच्या शेतीत राबताना आदिवासी ठाकर समाजातील महिलांना देखील त्यांनी प्रशिक्षण देत रोजगाराची संधी दिली. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना जिल्हापरिषदेच्या कृषिनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

पुरस्काराबाबत प्रतिक्रीया देताना त्या म्हणाल्या, की लग्नाआगोदर आई वडिलांनी शेतीचे दिलेले संस्कार, पती पांडुरंग दळवी यांनी दिलेली साथ आणि मुलगा श्रीयशने  घरातील माझ्या सांभाळलेल्या जबाबदा-यांमुळे मी देशविदेशात जावून शेतीचे ज्ञान प्राप्त करू शकले. आज आम्ही सारे मिळून शेती करतो. आदिवासींनाही मोफत प्रशिक्षण देत त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळवून देणारा रोजगार देत असल्याचे मोठे समाधान आहे.

182
20641 views

Comment