logo

३०० कोटी रुपयांची फसवणूक करणारा भामटा अटक

कोल्हापूर : सान्विक वेल्थ मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून ४५ दिवसांत दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची सुमारे ३०० कोटी रुपयांची फसवणूक करणारा भामटा अक्षय अनिल कांबळे (वय २९, रा. सादळे, ता. करवीर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. १६) त्याच्या घरातून अटक केले. कांबळे याच्यावर जिल्ह्यात चार पोलिस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, तो दोन वर्षांपासून फरार होता. त्याचे कुटुंबीय आणि अन्य साथीदारही पोलिसांच्या रडारवर आहेत

121
17527 views