logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अकोला : लोकसभा मतदार संघ के खासदार माननीय श्री संजय भाऊ धोत्रे इनके विकास निधि अंतर्गत अकोला तालुके में 1कोटी 08 लक्ष्य रुपए निधि विकास काम के लिए भूमि पूजन समारोह संपन्न हुआ।

📍 अकोला (दि. १५/०३/२०२४)

अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.श्री.संजयभाऊ धोत्रे यांच्या विकास निधी अंतर्गत अकोला तालुक्यातील मौजे मोरगांव भाकरे, शिंगोली,कंचनपुर, लोणाग्रा,मंडाळा,दुधाळा, खांबोरा,गोपालखेड,निराट,टाकळी जलम येथे १ कोटी ०८ लक्ष रुपये किंमतीच्या विविध विकासकामांचा भुमिपुजन व लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला व सर्व विकासकामे जलदगतीने पूर्ण होऊन गावाच्या विकासात मोलाची भर पडेल हा विश्वास यावेळी व्यक्त केला.

यावेळी विकासकामांमध्ये,
१) मोरगांव भाकरे ता.जि. अकोला येथे मारोती मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे. १० लक्ष रुपये
२) मौजे शिंगोली ता. बाळापूर फाट्यावर प्रवासी निवारा बांधकाम करणे. १० लक्ष रुपये
३) मौजे कंचनपुर येथे चोरे विद्यालय ते रामकृष्ण चोरे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. १० लक्ष रुपये
४) लोणाग्रा येथे हिंदु स्मशानभुमी ते संतोष थोते यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. १० लक्ष रुपये
५) मौजे मंडाळा येथे हनुमान मंदिर ते राधेश्याम बारगीर यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. १० लक्ष रुपये
६) मौजे दुधाळा येथे श्रीकृष्ण जोशी ते बळवंत जोशी यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करणे. १० लक्ष रुपये
७) खांबोरा येथे महादेव चितोळे ते बाळू ढोरे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. १० लक्ष रुपये
८) गोपाल खेड ता.जि. अकोला येथे मोडक ते संतोष मोडक यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. १० लक्ष रुपये
९) मौजे निराट येथे अमोल परनाटे ते नाना तिरुख यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. १० लक्ष रुपये
१०) टाकळी जलम येथे जि.प. शाळा परिसरात पेवर ब्लॉक बसविणे. ०८ लक्ष रुपये
११) टाकळी जलम अहिल्याबाई होळकर नगर बेलदार समाज वस्ती अंतर्गत नाली बांधकाम करणे किंमत १० लक्ष रुपये आदी कामांचा समावेश आहे.

याप्रसंगी माजी आमदार बळीरामजी सिरस्कार,तालुकाध्यक्ष देवेंद्रजी देवर,गणेश लोड,वैभव माहोरे,पवन महल्ले,मनीरामभाऊ टाले,किशोर खोले महाराज, हिम्मत देशमुख,डॉ. किरण ठाकरे,ज्ञानेश्वर ठाकरे,श्रीकृष्ण मोरखडे,शिवशंकर डिक्कर,राजू पाटील वैराळे,सरपंच नारायण बोर्डे,सुनील परनाटे,सरपंच प्रिया सराटे यांच्यासह भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

125
1 comment
11016 views

Comment