logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

या देशाने गांधी या आडनावाच्या व्यक्तींची परीक्षा घेतली; त्यांना रक्त सांडावं लागलं’, मेहबुबा मुफ्ती यांचं भावनिक भाषण

देशाने गांधी या आडनावाच्या व्यक्तींची परीक्षा घेतली. महात्मा गांधी असो की इंदिरा गांधी असो की राजीव गांधी त्यांना परीक्षा द्यावी लागली. रक्त सांडावं लागलं. तुमच्या नावामागे गांधी आडनाव आहे. त्यामुळे तुम्हाला त्रास दिला जात आहे. या आडनावाला भाजप घाबरत आहे”, असं पीडीपी पक्षाच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उद्देशून म्हणाल्या. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होतोय. या समारोपाच्या निमित्ताने इंडिया आघाडीची मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर भव्य सभा आयोजित करण्यात आलीय. इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भरगच्च गर्दीने संपूर्ण शिवाजी पार्क भरलंय. या सभेत संबोधित करताना मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

123
3152 views

Comment