logo

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर .....उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या हस्ते सन्मान...

मुंबई, मातोश्री येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा समन्वयकांची बैठक संपन्न;
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या हस्ते सन्मान;

प्रतिनिधी (राजरत्न बाबर)

पंढरपूर :- मुंबई येथील मातोश्री बंगल्यावरती शिवसेना पक्षप्रमुख मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या जिल्हाप्रमुख व समन्वयक यांची बैठक दिनांक 05 एप्रिल, 2024 रोजी संपन्न झाली.

या बैठकीस शिवसेना प्रतोद तथा विभागीय नेते मा. आमदार सुनील प्रभू , शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा. अनिल कोकीळ तसेच पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, जिल्हा प्रमुख अजय दासरी , जिल्हा प्रमुख अमर आण्णा पाटील, जिल्हा समन्वयक दीपक मेंबर गायकवाड, महानगर प्रमुख विष्णू महाराज कारमपुरी, विधानसभा संपर्कप्रमुख काशिनाथ बासुतकर, शहर प्रमुख (दक्षिण) शरणराज केंगनाळकर, तालुका प्रमुख बंडू घोडके, कैलास खंडागळे, विधानसभा प्रमुख रणजीत कदम, सोशल मीडिया प्रमुख ऋषिकेश कवडे तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या सोलापूर व माढा मतदारसंघातील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी काम करावे असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी दिले.

याप्रसंगी, श्री संभाजी शिंदे, शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख तथा सदस्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्या हस्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा श्री विठ्ठलाची प्रतिमा, मूर्ती, दैनंदिनी, दिनदर्शिका व भगवे उपरणे देऊन येथोचित सन्मान करण्यात आला.

147
1537 views
1 comment  
  • Babasaheb Dharma Janrao

    Best 🌹🌹🌹🌹🌹