logo

जळगाव -छ संभाजीनगर महामार्गवर निल्लोड फाटा येथे अपघात, 10 किमी पर्यंत वाहनांच्या रांगा; वाहतूक ठप्प

सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाटा येथे पुलावर बांधकाम सुरु असल्याने रस्ता अरुंद आहे. एम एच 12 के पी 3085 छ. संभाजीनगर कडे जाणारा सिमेंट चे टँकरचे टायर तुटून यू पी 79 ए टी 1563 ट्रक ला धडकले व यात जीवितहानी तळली त्यातच दोन ट्रकचा अपघात झाल्यानं वाहतूक ठप्प झाली होती.
छत्रपती संभाजीगरमध्ये सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाट्याजवळ अपघातामुळे जळगाव महामार्गावर वाहनांची दहा किलोमीटरपर्यंत रांग लागली होती.
एसटी बस, मोठे ट्रक यांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून जवळपास दोन तास महामार्ग ठप्प होता.
अपघातानंतर दहा किमी पर्यंत वाहतुकीच्या रांगा लागल्या असताना पोलीस मात्र कुठेच दिसत नव्हते. यामुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली.
-----------------------------------
वाहतूक वळविली
महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याने केऱ्हाळा फाटा पांदी मार्गाने व निल्लोड बोरगाव कासारी पिंपळगाव पेठ मार्गे वाहतूक वळविण्यात आली होती. पांदी मार्गे जाणारी वाहतूक काही मोठ्या ट्रकदेखील त्याच मार्गे गेल्या. मात्र पुढे इलेक्ट्रिक तारा असल्यामुळे परत वळविण्यात आली.

------------------------------
10 कि.मी.पर्यंत रांगा......
निल्लोड येथील वारकरी शिक्षण संस्था समोरील पुलावर आयशर गाडीचा टायर फुटल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. दुसरीकडून पुलाचे काम चालू असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यामुळे ---अपघात स्थळपासून भवन पर्यंत तर दुसरीकडून बनकिन्होळा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
-------------------------------
९ वर्षापासून रोडचे चालू .....
जळगाव ते छ संभाजीनगर रोडचे काम २०१५ पासून चालू आहे ९ वर्षे होऊन हि रोडचे व पुलाचे जागो जागी काम अजून हि अर्धवटच आहेत याकडे ठेकेदाराचे व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून त्याची तातडीने चौकशी करावी अशी

21
4158 views