
महाराष्ट्र के छ. संभाजीनगर जिले के सिल्लोड तालुका के भवन गाव से , भवन ग्रामपंचायत च्या ग्रामसेवकाला महात्मांच्या जयंतीची वावडे, हप्त्यातून एक दिवस ग्रामपंचायतला हजरी.....
भवन -प्रतिनिधी
सिल्लोड तालुक्यातील भवन ग्रामपंचायत मध्ये दरवर्षी प्रत्येक महात्म्यांच्या जयंती उत्साहात साजरा करण्यात येतात,
मात्र नव्याने रुजू झालेले ग्रामसेवक उत्तम बारसे यांना जयंतीचे वावडे असल्याचे भवन ग्रामपंचायत मध्ये दिसून आले आहे,सदरील ग्रामसेवक हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीला गैरहजर होते,
यानंतर संपूर्ण जगात 14 एप्रिल ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते मात्र भवन ग्रामपंचायत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सुद्धा ग्रामसेवक हे गैरहजर असल्याचे चित्र समोर आले आहे, गेल्या एक महिन्यापासून भवन गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली असून,
गटविकास अधिकारी यांनी विहिरी अधिग्रहण करण्याचे आदेश ग्रामसेवक यांना दिले असून मात्र अजून पर्यंत कोणत्याच प्रकारच्या विहिरी अधिग्रहण करण्यात आले नाही, यामुळे गेल्या एक महिन्यापासून भवन गावात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे,
सदरील ग्रामसेवक हे ग्रामपंचायत कार्यालयात अनुपस्थित राहतात, मुख्यालयात राहण्याचे आदेश असताना सुद्धा सदरील ग्रामसेवक ही छत्रपती संभाजीनगर येथून अपडाऊन करत असतात हप्त्यातून एक दिवस ग्रामपंचायतला भेट देत असून यामुळे, नागरिकांना लागत असलेल्या प्रमाणपत्रांना 15 ते 20 दिवसाचा वेळ लागत आहे, तरुणांमध्ये पोलीस भरती विविध नोकरी भरतीसाठी विविध प्रमाणपत्रांची गरज असून मात्र याकडे ग्रामसेवकच कार्यालयात उपलब्ध नसल्याने प्रमाणपत्र मिळत नसून यामुळे तरुणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चित्र निर्माण झाले आहे,
या प्रकरणाकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे नसता त्या ग्रामशेवकविरुद्ध तीव्र आंदोलन करणार असल्याचे गावाकऱ्यांनी म्हटले आहे.ग्रामसेवक यांना संपर्क केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
--------------------------------
साहेबराव शेळके...
विस्तार अधिकारी पं.स.सिल्लोड
सदरील ग्रामसेवक भवनचे सरपंच यांनीच शिफारस करून घेतलेला आहे. आम्ही अगोदरच सांगितले होते कि तो ग्रामसेवक डिफॉल्टर आहे. त्यावर कारवाई साठी प्रस्ताव बिडीओ साहेबाना पाठवतो....