मसाल्याच्या दुकानात चोरी 50 हजाराचे साहित्य लंपास
मसाला दुकानातून अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना आज २३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, रिसोड शहरातील भाजी मार्केटमध्ये अमोल बेले व अरबाज पठाण यांचे मसाल्याचे दुकान असून, सोमवारी 22 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दोघेही दुकान बंद करून घरी गेले. आज मंगळवार रोजी सकाळी 8.00 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेजाऱ्याने त्यांना फोनवरून याची माहिती दिली. अमोल बेले आणि अरबाज पठाण हे त्यांच्या दुकानात पोहोचले असता त्यांना त्यांच्या दुकानाच्या मागील बाजूचे टिन उखडलेले दिसले. दुकानात जाऊन पाहिले असता विविध मसाले गायब असल्याचे दिसून आले. याबाबत अमोल बेले यांनी पोलिसांत तक्रार करून एकूण ५० हजार रुपयांचा माल चोरीस गेल्याची नोंद केली. यामध्ये अरबाज पठाणच्या २० हजार रुपयांच्या मसाला मालचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून, गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.