logo

रिसोड शहरांमध्ये रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळेच नागरिकांना त्रास

संथ गतीने सुरू असलेल्या कामाचा नागरिकांना त्रास, व्यापाऱ्यांचे नुकसान

अकोला हिंगोली सूर असलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे तर व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना धूळ व मातीचा त्रास होत असून हाच त्रास व्यापारिनाही होत आहे. संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे मात्र व्यापाऱ्यांचे चांगलेच नुकसान होत आहे. सदर रस्ता बिबखेड ते रिसोड शहरातील ग्रामीण रुग्णालयापर्यंत गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला होता. मात्र सदर रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाले असून गेली अनेक महिन्यापासून सुरू असलेले हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सदर रस्त्यावर रिसोड शहरातील मालेगाव नाका परिसरामध्ये छोट्या नाल्याचे काम सुरू असून खोदून ठेवलेल्या या नाल्याचे काम जरी केले असले तरी मात्र आजूबाजूचा भरणा अजून केलेला नाही. यामध्ये नागरिक पडून जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. गेली काही दिवसांपूर्वी सदर नाली खोदत असताना पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाण्या पाणी वाया गेला होता. मालेगाव नाकावरील खोदून ठेवलेला नाला आजुबाजुला भरणा केला नसल्याने या ठिकाणी रसवंती व हॉटेल व्यापाऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. सदर व्यापाराची रसवंती व हॉटेल बंद असल्याने त्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


माझ्या हॉटेल व रसवंती समोर नाल्याचे काम गेले अनेक दिवसापासून संथगतीने सुरू आहे.ऐन उन्हाळ्यात माझी रसवंती बंद असल्याने माझ्यावर रोजगाराचा प्रश्न असून उपासमारीची वेळ आलेली आहे. माझ्यासमोरच नालीमध्ये अनेक जण पडून जखमी झाल्याचेही घटना घडलेल्या आहेत. याकडे लवकरात लवकर संबंधित विभागाने लक्ष द्यावे.

अनिल पवार
रसवंती संचालक, मालेगाव नाका, रिसोड


सदर रस्त्याबाबत वारंवार तोंडी सूचना देऊनही रस्त्याच्या कामाची गती वाढत नाही. यातच मालेगाव नाका ते वाशीम नाकापर्यंतच्या रस्त्याचे कामांमध्ये काही ठिकाणी हलगर्जी पण नाही केलेला आहे. अनेक ठिकाणी नालीवरील ढापे हे निकृष्ट दर्जाचे असल्याने ते पडले आहे. याबाबत सूचना देऊनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.

6
1242 views