logo

COVID Vaccine Side Effects : कोरोनाच्या दुष्परिणामावरून पंतप्रधान मोदींसह सीरम विरोधात वाराणसी न्यायालयात याचिका, काय आहे नेमकं प्रकरण

COVID Vaccine Side Effects : कोरोनाच्या दुष्परिणामावरून पंतप्रधान मोदींसह सीरम विरोधात वाराणसी न्यायालयात याचिका, काय आहे नेमकं प्रकरण?

https://24newsnetwork.live/2024/05/covid-vaccine-side-effects-koronachya-dushhprianamavroon-pantprdhan-modeensh-seerm-virodhat-varaansee-nyayalyat-yachika-kay-aahe-nemkan-prkran/
COVID Vaccine Side Effects : कोरोनाच्या दुष्परिणामावरून पंतप्रधान मोदींसह सीरम विरोधात वाराणसी न्यायालयात याचिका, काय आहे नेमकं प्रकरण?

#COVIDVaccineSideEffects #CovidVaccine #COVID #PMModi #VaranasiCourt #MaharashtraNewsकोरोनाच्या दुष्परिणामावरून पंतप्रधान मोदींसह सीरम विरोधात वाराणसी न्यायालयात याचिका, काय आहे नेमकं प्रकरण पंतप्रधान मोदींविरोधा दाखल केली याचिकाCOVID Vaccine Side Effects वाराणसी न्यायालयात पंतप्रधान मोदींसह 28 जणांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. खोटे बोलून लाभ घेण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यानं केला आहे
COVID Vaccine Side Effects - कोरोना लशीचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर देशात प्रथमच न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यानं वाराणसी न्यायालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सीरम इन्स्टिट्यूट कंपनी, सीरमचे सीईओ अदार पुनावाला, कोरोना लस कंपनीसह कंपनीच्या चेअरमन अशा 28 जणांविरोधात याचिका दाखल केली. या प्रकरणाची 23 मे रोजी सुनावणी होणार आहे.

वाराणसीमधील युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा वकील विकास सिंह यांनी वकील गोपाल कृष्ण मार्फत यांच्यामार्फत न्यायालयात मानव अधिकार अधिनियम १९९३ अंतर्गत वाराणसी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी याचिकेत म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सीरम कंपनी, सीरम कंपनीचे चेअरमन, अॅस्ट्राझेनेका कंपनीसह चेअरमन यांच्यासह २८ जणांनी संगनमत केले. त्यांनी कोणतंही परीक्षण न करता कोव्हिशील्ड लस तयार केली. लोकांना भीती घालून बळजबरीनं लस दिली. त्यामधून त्यांनी लाभ मिळविला.

दुष्परिणाम झालेल्या लोकांना नुकसान भरपाई द्यावी- लसनिर्मिती करणाऱ्या कंपनीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाभ मिळाला. मोदींना सीरमकडून देणगी मिळाली. लसीचे दुष्परिणाम माहित असतानाही त्यांनी लोकांना मृत्यूच्या दरीत ढकलले. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता न्यायहित आणि जनहित लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी सहित 28 जणांना दंड ठोठावा. ज्या लोकांवर कोरोना लशींचे दुष्परिणाम झाले आहेत, अशा लोकांना नुकसान भरपाई दिली जावी, अशी याचिकाकर्त्यानं विनंती केली आहे.

सीरमनं घेतलं होते कोव्हिशिल्डचं उत्पादन- कोरोना लशींच्या दुष्परिणामाबाबत अॅस्ट्राझेनेका या लस उत्पादक कंपनीनं कबुली दिल्यानंतर जगभरात खळबळ उडाली. अॅस्ट्राझेनेका लस घेतल्यानंतर काही जणांच्या रक्तवाहिन्यांत गाठी निर्माण होण्याचा विकार ( Thrombosis Thrombocytopenia Syndrome TTS) होतो. मात्र, अशी प्रकरणे अत्यंत कमी असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांच म्हणणं आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनदेखील अॅस्ट्राझेनेका प्रमाणं कोव्हिशिल्डची निर्मिती करून वितरणं केलं. मात्र, त्यासाठी एमआरएनएचा वापर केला नाही. कोरोनाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्यानं सीरमनं यापूर्वीच कोव्हिशिल्डचं उत्पादन थांबविलं आहे.

काय आहे डॉक्टरांचं मत- मुंबईतील डॉक्टर आशिष कुमार यांच्या माहितीनुसार लशींचे अत्यंत कमी किंवा मध्यम दुष्परिणाम होऊ शकतात. मात्र, कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांनी भीती बाळगण्याचं कारण नाही. त्या लसीमुळे जीविताला धोका किंवा आरोग्यार गंभीर परिणाम होण्याची अत्यंत कमी शक्यता आहे.

0
3643 views