दहेगाव येथील पेट्रोल पंप च्या बाजूला असलेल्या चींदी कंपनी मुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे नागरिकांना होतो त्रास
कळमेश्वर तालुक्यातील दहेगाव येथे पेट्रोल पंप च्या बाजूला भरपूर वर्षांपासून चिंदी कंपनी म्हणून कापूस वर प्रक्रिया करणारी कंपनी आहे. त्या कंपनी मुळे खूप वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे. कंपनी च्याच बाजूला शांती आश्रम म्हणून चर्च आहे जेथे असलेल्या विहिरी मधे असलेल्या पाण्यावर कापसाच्या धुळीच्या सायीचा थर साचून असतो आणि विशेष म्हणजे त्या चर्च मधे असलेल्या लोकांना पाणी पुरवठ्याचा साधन म्हणजे तीच विहीर आहे. आणि कंपनी च्या आजू बाजूच्या परिसरात सुद्धा धुळीच प्रमाण वाढलेलं आहे. कंपनी धारक कुठलेही परवण्या शिवाय ती कंपनी चालवत आहे. ग्राम पंचायत कडून कंपनी ला नोटीस दिले असता कंपनी मालक नोटीस स्विकरण्या करीता सुद्धा तयार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार त्या कंपनी कडे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्रदान केली जाणारी कोणतीही प्रमाणपत्रे नाहीत. त्या कंपनी वर कार्यवाही करून होत असलेले प्रदूषण थांबवण्याची मागणी युवासेना कळमेश्वर तालुका प्रमुख मंगेश भाऊ गमे यांनी केली आहे अन्यथा कंपनी विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे.तालुका प्रतिनिधी सुमित गमे