logo

खेड तालुका हादरला

खेड तालुका हादरला, अल्पवयीन मुलींना इंजेक्शनमधून ड्रग्ज देऊन, दारू व बिअर पाजून बलात्कार, तीन जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक, मुख्य सूत्रधार फरार
पुणे : लैंगिक सुखाची हवस भागवण्यासाठी तीन युवकांनी ओळखीच्या असलेल्या दोन अल्पवयीन मुलींना विश्वासात घेऊन त्यांना ड्रगचे इंजेक्शन दिले. तसेच त्यांना लॉजवर नेऊन बिअर आणि दारू प्यायला देऊन सलग रात्रभर त्या अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार करून अक्षरशः लचके तोडल्याचा भयानक आणि किळसवाणा प्रकार खेड तालुक्यात घडला असल्याचे समोर आले असून या घटनेमुळे खेड तालुका हादरला आहे. ड्रग्जची पाळेमुळे पुणे शहराच्या बाहेर पसरल्याने ग्रामीण भागातील पालकांची चिंता वाढली आहे. याप्रकरणी तीन जणांवर खेड पोलीसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. यातील मुख्य सुत्रधार मात्र फरार झाला आहे.

यातील एक युवक अल्पवयीन आहे. फरार झालेला प्रमुख आरोपी हा ड्रग पुरवणारा सुत्रधार असुन त्याच्याकडून आत्तापर्यंत किती जणांना ड्रग पुरवले? याबाबतीत पोलिस माहिती घेत आहेत. दरम्यान, मंगळवारी (दि १४) रात्री हा प्रकार घडला. बुधवारी सकाळी नशेत झिंगून घरी परत आल्यावर मुलींच्या पालकांच्या ही बाब लक्षात आली अन प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. राजगुरुनगर शहर परिसरात वास्तव्य असलेली आणि महाविद्यालयात शिकत असलेली ही मुले, मुली असून त्यांच्या या प्रकाराची माहिती बाहेर आल्यानंतर अशा वयातील मुलांच्या पालकांमध्ये चिंता आणि भितीचे वातावरण पसरले आहे.

आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महत्त्वाचा तपास सुरू असून सर्व प्रकाराबाबत सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेऊन मीडियाला माहिती देण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितलं

18
480 views