logo

सावनेर शहरातील तैयबा फातिमा, शिब्रा आणि आयशा यांची उंच भरारी .

सावनेर शहरातील तैयबा फातिमा, शिब्रा आणि आयशा यांची उंच भरारी .
प्रतिनिधी :- ऑल इंडिया.. मीडिया असोसिएशन नागपूर डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट.
सावनेर : (दि.18 मे )
नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात सावनेर शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य व बुद्धिमत्ता दाखवून चांगल्या टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण होऊन आपल्या शहराचा गौरव केला आहे.
कळमेश्वर तालुका अंतर्गत आष्टी गावात असलेल्या भवन्स विद्या मंदिर (CBSE) या इयत्ता 10वी ची विद्यार्थिनी तैयबा शफीक सय्यद हिने 91% गुण मिळवले, त्याचप्रमाणे सावनेर तालुक्यातील आजनी स्थित सारस्वत सेंट्रल पब्लिक स्कूल (CBSE) या इयत्ता 10 वी ची विद्यार्थिनी शिब्रा अफजल सौदागर हिने 90.60% गुण मिळवून तर आयशा अशफाक फारुकी हिने 87.20% गुण मिळवून 10वी उत्तीर्ण करून तिच्या आई-वडिलांचा आणि कुटुंबाचा गौरव केला आहे.
त्यामुळे समाजाचा अभिमानही वाढला आहे.
भवन्स विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी असलेल्या तय्यबा शफिक सय्यद हिला प्रथम तिच्या आजोबांकडून अभ्यासाची प्रेरणा मिळाली. तय्यबा फातिमा सय्यद यांचे आजोबा सावनेर शहरातील नगर परिषद उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक होते. या कारणास्तव तैयबा फातिमाला आधीच अभ्यासात जास्त रस आहे. अभ्यासात रस नसेल तर भविष्यात कोणतीही व्यक्ती प्रगती करू शकत नाही, असा विश्वास तैयबा फातिमा यांनी व्यक्त केला.
आजच्या या आधुनिक युगातील बदलत्या वातावरणात मोबाईलच्या सवयीमुळे बहुतांश विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरित परिणाम होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे अभ्यासावरचे लक्ष कमी होणे नित्याचे झाले आहे.
मात्र तैयबा फातिमा, शिब्रा, आयशा यांसारख्या अनेक विद्यार्थिनींनी याकडे दुर्लक्ष करून मेहनत आणि समर्पण दाखवून दहावी चांगल्या टक्केवारीने उत्तीर्ण केली.
मोबाईलचा वापर कसा करायचा हे स्वतःवर अवलंबून असते, सकारात्मक विचार करून मोबाईलचा योग्य वापर केला तर वाचनाची आवड दुपटीने वाढते, असे मत शिब्रा यांनी व्यक्त केले .
तसेच कुटुंबीयांच्या मदतीशिवाय आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही.
तय्यबा फातिमा, शिब्रा आणि आयशा यांनी त्यांच्या शिक्षणाचे सर्व श्रेय त्यांचे कुटुंब आणि शाळेतील शिक्षकांना दिले आहे. यांना नेहमीच अभ्यासात रस असल्याने तिघ आज इथवर पोहोचली आहे.
याप्रसंगी शहरातील समाजातील जागरूक लोकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तैयबा शफीक सय्यद , शिब्रा अफजल सौदागर आणि आयशा अशफाक फारुकी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभार्शिवाद दिले.
*यावेळी राहत फाऊंडेशनचे पदाधिकारी व अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष सादिक शेख, सामाजिक कार्यकर्ते डोमासव सावजी, माजी नगरसेवक शफीक सय्यद, शकील झेडिया, अनीस ईसराइल शेख, शाहरुख शेख, कमरुद्दीन अली शेख, डॉ.इमरान खान, रफिक शाह, डॉ. साजिद वहाब खान, कलाम शेख , मौलाना शराफत हुसेन, मुश्ताक अहमद शेख , सलीम पठाण व तिन्ही विद्यार्थिनींचे पालक उपस्थित होते.*

22
3034 views