logo

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर भर उन्हात शेतकऱ्यांचा रास्ता रोको ; शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी

राहुरी - मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडावे; या मागणीसाठी राहुरी येथे शेतकऱ्यांनी नगर- मनमाड महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी अर्धनग्न होत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. तसेच लवकरात लवकर शेतीसाठी पाणी सोडले नाही, तर हजारो शेतकऱ्यांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला. जिल्ह्यावर तीव्र पाणी टंचाईचे संकट असून पिके करपू लागली आहेत. यामुळे राहुरी तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेती पिकांसाठी पाणी सोडावे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी नगर- मनमाड महामार्गावर अर्धनग्न होत रास्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

वारंवार निवेदन देऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांना भर उन्हात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. शेतीसाठी आवर्तन सोडले नाही; तर अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे व यशवंत सेनेचे जिल्हा अध्यक्ष विजयराव तमनर व उपस्थित शेतकऱ्यांनी दिला आहॆ.

2
1425 views