logo

डोणगाव आठवडी बाजारातील अतिक्रमणावर चालला जेसीबी

इरफान शाह आयमा न्युज मेहकर(बुलढाणा):-
डोणगाव येथील आठवडे बाजारातील अतिक्रमण ग्रामपंचायतीने १६ मे रोजी जेसीबी लावून काढले. यासंदर्भात मध्यंतरी दवंडीद्वारे आठवडे बाजारात ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांनी ते काढून घ्यावे, असे सूचित करण्यात आले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
डोणगाव येथे स्थानिक आठवडे बाजारात अनेकांनी आपले छोटे मोठे व्यवसाय अतिक्रमण करून सुरू केले होते. त्यामुळे आठवडे बाजाराचा अतिक्रमणाचा विळखा पडला होता. परिणामी येथे ये-जा करण्यासही जागा शिल्लक राहिली नव्हती. ठिकठिकाणी दुकाने व लोटगाड्या लावून अतिक्रमण करण्यात आले होते.
ग्रामपंचायतीने हे अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्यानंतरही अतिक्रमण न काढण्यात आल्याने अखेर ग्रामपंचायतीने १६ मे रोजी ही कारवाई केली. यावेळी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी दीपक तांबारे व सरपंचासह सर्व सदस्य उपस्थित होते•

12
782 views