logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सांगलीचे आरोग्य अधिकारी राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

सांगली महाराष्ट्र : राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी
(डीएचओ ) स्पर्धेत जिल्ह्याने आघाडी घेतली
मार्च मधील क्रमवारी बुधवारी जाहीर करण्यात आले त्यामध्ये सांगलीचे आरोग्य अधिकारी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
यापूर्वी विसाव्या क्रमांकावर असणारा सांगली जिल्हा आता थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली
प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे नागरिकांना दिलेला दर्जा आरोग्य सेवा आणि सुविधामुळे ही आघाडी मिळाले आहे गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्याची मोहीम सुरू आहे भौतिक सुविधा सुधारण्यावर भर दिला आहे त्यामुळे केंद्राचा कायापालट होत आहे अनेक सुविधांमध्ये सुधारणा झाले आहे गतवर्षी जिल्हा सातत्याने या क्रमांक वारीत आघाडीवर होता मात्र डिसेंबर 2023 मध्ये 38.13 गुण मिळाले गुणांक 1.74 ने कमी झाले त्यामुळे क्रमवारीत घसरण झाली होती.
प्रशासनाने यांची गांभीर्याने दखल घेतली मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांनी यंत्रणेत सुधारणा केल्या त्यानंतर जिल्ह्याने पुन्हा आघाडी घेतली
पहिल्या क्रमांकावर अकोला व दुसऱ्या क्रमांकावर नागपूर जिल्हा पटकावला. तिसरा क्रमांक सांगलीला मिळाला.
प्रत्येक महिन्यात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती घेण्यात येते.
मलेरिया, डेंगू कुटुंब कल्याण अशा विविध आजार आणि योजना अंमलबजावणी कशा पद्धतीने होते याचा सविस्तर आढावा घेतला जातो प्रशासकीय कामकाजाची माहिती घेण्यात येते त्यानंतर इतर जिल्ह्याची तुलना करू क्रमवारी घोषित केली जाते आरोग्य विभागाने नियोजन पूर्वक सातत्य राखून काम केल्याने यश मिळाले भविष्यात जिल्हा प्रथम क्रमांक पटकावेल या दृष्टीने नियोजन सुरू आहे.
लोकसभागातून अजून प्रभावीपणे सेवा देण्या वर आमचा भर आहे डॉक्टर विजयकुमार वाघ जिल्हा आरोग्य अधिकारी

152
11605 views

Comment