logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कर्जत-जामखेड मतदारसंघातुन रोहीत पवारांना जोरदार धक्का

मुंडे कुटुंबावर वारंवार केलेले खोटे आरोप सहन न झाल्याने कट्टर समर्थक,वंजारवाडी गावातील प्रमुख कार्यकर्त्याचा भारतीय जनता पार्टित जाहीर प्रवेश*

*आ,प्रा राम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात चोंडी येथील निवासस्थानी पक्षप्रवेश!*
वंजारवाडी गावातील युवा नेतृत्व मा,विष्णु जायभाय २०१४ पासुन रोहीत पवार यांच एकनिष्ठेने काम करत होते गेल्या आठवड्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निलेश लंकेचे बुथवर पोलिंग एजंट म्हणुन जबाबदारी सांभाळत पक्षाला चांगल्या प्रकारे मतदान करून घेतलं होतं,
पण रोहीत पवार यांच्याकडुन मुंडे कुटुंबियांवर वारवांर सुडबुध्दीने बोगस मतदानाचे खोटे आरोप केलेले सहन न झाल्याने मा, विष्णु जायभाय यांनी रोहीत पवारांची साथ सोडत आज आ,प्रा राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुढची राजकीय वाटचाल भारतीय जनता पार्टि सोबत करण्याचा निर्णय घेतला आणि आज जाहीरपणे पक्षप्रवेश केला,
रोहीत पवारांसाठी हा मोठा राजकीय धक्का आहे मुंडे कुटुंबावर केलेल्या खोट्या आरोपाची रोहीत पवारांना मतदारसंघात किंमत मोजावी लागणार हा अंदाज अनेकांना येत होता,आज खरोखरच सुरवात झाल्याने रोहीत पवारांची डोकेदुखी वाढली आहे.
पिढ्यानपिढ्या भाजपा समर्थक गाव असतानाही मा,विष्णु जायभाय यांनी *२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आ रोहीत पवारांना गावातुन जवळजवळ ५० % मतदान करत मोलाची भुमिका पार पाडली होती,*
*अशातचं मा,विष्णु जायभाय यांचा भाजपा प्रवेश हा रोहीत पवारांसाठी मोठा राजकीय धक्का आहे

112
1 comment
13795 views

Comment