आर्वी तील प्राचीन शनिदेव मंदिरात ६ जून रोजी होणार प्रगटदिन साजरा...!!
प्रतिनिधी वर्धा आर्वीतील प्राचिन शनिदेव मंदिरात ६ जुन रोजी प्रकटोत्सव 🚩*आर्वी येथील शनि मंदिर वार्ड येथे प्राचीन शनि मंदिर आहे. या मंदिराची स्थापना वि. क्र. सं. १८४१ मध्ये पंडित सोबकसा राम यांनी केले होती. तेंव्हापासून सद्यस्थितीत त्यांची ७ वी पिढी या मंदिरात सेवा देत आहेत. ७ व्या पिढीतील पंडीत मुन्नालाल डाकोत यांच्या पुढाकाराने २०२१ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार व मुर्तीची पुन्हा नव्याने प्राणप्रतिष्ठापना झाली होती.पंडित मुन्नालाल डाकोत यांच्या काळात मंदीरात नित्यनेमाने शनिदेवाच्या मुर्तीला अभिषेक, हवन, भजन, कीर्तन होत असतात. त्याच प्रमाणे वर्षभरात बसंत पंचमी मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने ५६ भोगाचा नैवेद्य आणि महाप्रसाद वितरण, जेष्ठ महिन्यातील अमावास्याच्या दिवशी शनि जयंती निमित्ताने अभिषेक, हवन, पुजन, महाप्रसाद असतो व श्रावण महिन्यात हरीयाली अमावास्याच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडत असतो.या वर्षी शनिदेव जयंतीच्या निमित्ताने साडेसाती च्या प्रभावातून लाभ मिळण्यासाठी श्री शनिदेवांचा तेल अभिषेक दिनांक ६ जुन २०२४ रोज गुरुवार ला सकाळी ६:३० ते २ वाजेपर्यंत केला जाणार आहे. संध्याकाळी ७:३० वाजता श्री शनिश्रृंगार महाआरती आणि रात्री हवन पुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक ७ जुन २०२४ ला पद्मावती चौकातील प्रताप भवन येथे दुपारी १ वाजे पासून ४ वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात श्री शनिदेव जयंती निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन पंडित मुन्नालाल डाकोत यांनी केले आहे.