logo

निश्चय तो उभा खडकावर पावसाची सर आली आणि ढेकळे विरघळून गेली राहीला तो काळा कभिन्न खडक ढेकळांची माती इतस्ततः प्रवाहासोबत वाहताना ओढीनाली कालमाना बरोबर साचत राहते माती त्या काळ्याकभिन्न पाषाणाभोवती येतात जातात पावसाळे पण ढळत नाही ती निश्चय मूर्ती #राजू_वाघमारे १५/०६/२०२३

निश्चय तो उभा
खडकावर
पावसाची सर आली
आणि ढेकळे
विरघळून गेली

राहीला तो
काळा कभिन्न खडक
ढेकळांची माती
इतस्ततः प्रवाहासोबत
वाहताना ओढीनाली

कालमाना बरोबर
साचत राहते माती
त्या काळ्याकभिन्न
पाषाणाभोवती
येतात जातात पावसाळे
पण ढळत नाही
ती निश्चय मूर्ती
#राजू_वाघमारे
१५/०६/२०२३
8668320104

0
0 views