logo

ग्लोबल ह्यूमन राईटस् प्रोटेक्शन फोरम, आसाम तर्फे दिल्ली येथे सारथी संस्था बुलढाणा ला गौरव पुरस्कार.

■ AIMA न्यूज नेटवर्क

*बुलढाणा*। प्रतिनिधी

दि.१७-०६-२०२४ रोजी, आपल्या सामाजिक व धार्मिक समर्पित सेवेसाठी सारथी परीवार सेवा भावी संस्था चे सचिव यांना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले

उपरोक्त मानवाधिकार फोरमच्या वतीने सोशल इक्वलिटी इन् इंडिया अंतर्गत दिल्ली येथील द्वारका परिसरातील पालम अनलॉक च्या भव्य दिव्य सभागृहात, संस्थापक अध्यक्ष मा. महानंदा सरकार, गोहटी, आसाम तथा अंतर्राष्ट्रीय अध्यक्ष मा. बिरामनी नरेंद्र पासवान, राष्ट्रीय अध्यक्ष, नेपाळ, डॉ. प्रकाश
खंडागळे, महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस चे जनरल सेक्रेटरी मा. डॉ.राहुल सिंग, केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली चे कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. विजयकुमार कस्तुरे,एडव्होकेट, चिखली यांच्या सह देशाच्या विविध प्रांतातून तसेच विविध देशांच्या ज्येष्ठ तथा मान्यवर
व्यक्ती विशेषांच्या प्रमुख उपस्थितीत तथा सामाजिक
चळवळीतील ज्येष्ठ सेनानी तथा जी.एच.आर.पी.एफ चे
कार्यकारी अध्यक्ष तथा मुख्य संघटक मा. काशीराम
जी. पैठणे यांच्या अध्यक्षतेखाली देशाची राजधानी
दिल्ली येथे पालम अनलॉक च्या भव्य सभागृहात
आयोजित ७ व्या राष्ट्रीय /अंतर्राष्ट्रीय परिषद,२०२४
सादिक शाह सारथी परीवार चे सचिव  यांना त्यांच्या सामाजिक धार्मिक आणि अपघात ग्रस्त लोकांची व गरीब व गरजू लोकांना मदत करण्याचे कार्य पाहता  दि ग्लोबल ह्यूमन राईटस् प्रोटेक्शन फोरम, आसाम तर्फे दिल्ली येथे आयोजित
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नॅशनल अवार्ड ने सन्मानित करण्यात आले नरेंद्र पासवान, राष्ट्रीय अध्यक्ष नेपाळ यांच्या हस्ते सन्मानपत्र तथा स्मृतिचिन्ह
प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या अविस्मरणीय अशा सोहळ्यात इतरही अनेक मानव
सेवारत मान्यवरांना राष्ट्रीय तथा अंतर्राष्ट्रीय पुरस्कारांनी
पुरस्कृत करण्यात येवून नेपाळ येथील सुप्रसिद्ध नृत्यांगना
शीतल तथा आसामच्या ख्यातनाम गायिका मनिषा
शर्मा यांनी आपापल्या पारंपरिक पद्धतीने सुंदर नृत्यगान
करून सर्व पुरस्कृत मान्यवरांचे अभिनंदन केले.

48
17318 views