
अहवाल मिळाल्यानंतर एकोडी ग्रामपंचायत विरोधातील उपोषण मागे घेतला.
अहवालाने आंदोलनकर्ते ५०% समाधानी
अहवाल मिळाल्यानंतर एकोडी ग्रामपंचायत विरोधातील उपोषण मागे घेतला.
अहवालाने आंदोलनकर्ते ५०% समाधानी.
एकोडी, किरणकुमार मेश्राम
गोंदिया जिल्यातील एकोडी ग्रामपंचायत विरोधात मागील पंधरा दिवसांपासून सुरु असलेले उपोषण मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या अहवालानंतर मागे घेण्यात आले .
सविस्तर असे कि मागील ६ जून पासून ग्राम पंचायत कार्यालय एकोडी येथे पूर्व पंचायत समिती सदस्य जयप्रकाश बिसेन आणि वर्तमान ग्राम पंचायत सदस्य नामदेव बिसेन यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे उपोषण सुरु केले होते . त्यांच्या कडून एकोडी ग्रामपंचायत मध्ये करण्यात आलेले विकास कामात मोठ्याप्रमाणात झालेला घोळ या बाबत पंचायत समिती गोंदिया आणि जिल्हा परिषद गोंदिया येथे तक्रार करून चौकशी ची मागणी करण्यात आलेली होती.
अखेर मागील दोन आठवद्यांपासून गरम पंचायत समोर सुरु असलेला आंदोलन उप कार्यकारी अधिकारी जी आर खामकर यांचे कडून प्राप्त अहवालाच्या आधारे उपोषण मागे घेण्यात आला.
अहवालानुसार ग्राम एकोडी येथील विष्यांकित प्रकरणात सरपंच एकोडी या महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) अन्वये कार्यवाहीस पात्र ठरतात, तसेच ग्राम विकास अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता पंचायत समिती गोंदिया यांनी आपल्या निहित कर्तव्यात कसूर केल्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९६४ अन्वये प्रशासकीय कार्यवाहीस पात्र असल्याचे अहवालात नोंद करण्यात आलेली आहे. असे पत्र उपोषण कर्त्यांना देण्यात येऊन उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली, हे विशेष.
परंतु उपोषण कर्त्यांनी अहवाल हातात मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपोषण जरी मागे घेतला असेल पण ज्या ज्या कामात समाधान झाले नाही त्या कामात फेर चौकशी करण्याचे उपोषण कर्त्या कडून सांगण्यात आले. तर जिल्हा परिषद सदस्य अश्विनी पटले, पुर्व पं समिती सदस्य प्रकाश पटले यांच्या हस्ते उपोषण कर्ते जयप्रकाश बिसेन आणि नामदेव बिसेन यांना आमरस पाजुन उपोषण सोडविण्यात आले . या प्रसंगी पुर्व सरपंच रविकुमार पटले, पुर्व उप सरपंच किरणकुमार मेश्राम, पुर्व तमुस अध्यक्ष राजेश कुमार तायवाडे, गुलाब भागात, महेंद्र कनोजे, अरुण बिसेन, आरिफ पठाण, ईश्वर बिसेन , दुर्गेश जगणे, सुभाम बोदेले,ग्राम पंचायत सदस्य, दीपक रीनायात ग्राम पंचायत सदस्य, वाघारे ग्राम प सदस्य उपस्थित होते.