
तुळजापूर नगर परिषदेस प्रभारी ऐवजी पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व धाराशिव चे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी*
तुळजापूर जि. धाराशिव येथील नगर परिषदेत पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी तुळजापूर शहर शहरातील जागरूक नागरिकांनी धाराशिव जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे याबाबत तुळजापूर शहरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केलेली मागणी
अशी कि
तुळजापूर हे तीर्थ क्षेत्र असून महाराष्ट्राची कुलस्वामिनी असल्याने अनेक भक्त विविध राज्यातून श्री. कुलस्वामिनी च्या दर्शनास येत आहेत. व त्या भाविक भक्तांना भौतिक सुविधा मिळणे आवश्यक आहे. परंतू गेली दोन ते तीन वर्षापासुन नगर परिषदेत प्रभारी मुख्याधिकारी असल्याने शहरातील नागरीकांची व भक्तांची अडचण निर्माण झाली आहे प्रभारी मुख्याधिकारी असल्याने नागरीकांच्या अडचणी सोडवल्या जात नाहीत. शहरातील स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्याधिकारी पुर्णवेळ नसल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर अंकुश नाही व गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढल्याने नागरीकांची कामे होत नाहीत. शिवाय पाणी पुरवठा, विद्युत पुरवठ्या बाबत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. तसेच बोरी धरणातुन होणा-या पाणी पुरवठ्याच्या विद्युत मोटारीचे प्रमाण
अधिक असणे गरजेचे असताना दुर्लक्ष केल्यामुळे पाणी पुरवठ्यात अनियमितता आहे. महाराष्ट्र शासनाचे व केंद्र शासनाचे विविध उपक्रम राबविण्यासाठी पूर्ण वेळ मुख्य धिकारी असणे आवश्यक आहे.
तरी आमच्या विनंतीचा विचार करून त्वरीत पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावाअशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे
तसेच याबाबत तुळजापूर येथील "प्रकाश बळीराम घट "आणि इतर नागरिकांनी याबाबत धाराशिव जिल्हाधिकारी यांच्याकडे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्ती करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात केलेली मागणी पुढील प्रमाणे
तुळजापूर नगर परिषदेत गेले दोन-तीन वर्ष मुख्याधिकारी हे प्रभारी असल्याने कार्यालयीन कामासाठी अनेक नागरिक येतात परंतु जबाबदार अधिकारी नसल्याने जनतेची कामे होत नाहीत कर्मचारी कार्यालयीन वेळेत भेटत नाहीत शिवाय शहरात अस्वच्छता निर्माण होऊन साथीचे आजार वाढले आहेत शिवाय संपूर्ण शहरात अतिक्रमणाची अधिक प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे सध्याचे प्रभारी मुख्याधिकारी कार्यालयात केव्हा येतात व केव्हा जातात याची माहिती होत नाही त्यामुळे जनतेच्या अडचणी सोडवल्या जात नाहीत तसेच शहरातील अतिक्रमणे अनाधिकृत बांधकाम अस्वच्छता याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे शिवाय वरिष्ठांच्या आदेशाचे लेखी व तोंडी सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत त्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे हे महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शहरात असा भोंगळ कारभार होत आहे हेच तर तुळजापूर शहरातील नागरिकांचे आणि भाविकांचे दुर्दैव आहे तुळजापूर धाराशिव आंतर कमी असल्याने व वर्ग एकचे अधिकारी असलेले धाराशिव येथील मुख्याधिकारी यांना तुळजापूर नगर परिषदेत प्रभारी मुख्याधिकारी पदी पूर्ण वेळ नूतन मुख्याधिकारी येईपर्यंत नियुक्ती व्हावी अशी ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर तुळजापूर शहरातील अनेक नागरिकांच्या सा-या आहेत