आरोपींना फाशीची देण्यात यावी अशी मागणी
शेगाव : शेगाव तालुक्यातील नागझरी येथील क्रिष्णा कऱ्हाळे या चिमुकल्याचा खुनाने समाजमन हळहळले आहे. आरोपींना फाशीची देण्यात यावी अशी मागणी समोर येत आहे. दरम्यान क्रिष्णाचा निघृण खून करणाऱ्या आरोपींचे वकीलपत्र घेणार नसल्याचा ठराव शेगाव बार असोसिएशनने घेतला असून तसे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.
घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. अशा अपराधी प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसावा व त्यांना योग्य तो संदेश जावा म्हणून शेगाव वकील संघाने आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचे ठरवले आहे.. आरोपींनी वकीलपत्र घेण्यासाठी कितीही पैसे दिले तरी आम्ही आरोपींच्या बाजूने युक्तिवाद करणार नाही अशी भूमिका वकिलांनी घेतली आहे. तसा ठराव वकील संघाने घेऊन त्याची प्रती तहसीलदारांना दिली. या गुन्ह्याचा तपास शीघ्र गतीने करून प्रकरणात विशेष सरकारी वकील अॅड उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.