logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

रिपब्लिकन पक्ष गाव वाडी वस्ती तांड्यावर पोहचण्यासाठी परिश्रम घेणार !


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )गाव,वाडी,वस्ती, तांड्यावर पोहचण्यासाठी परिश्रम घेणार असुन, तळागाळातील कार्यकर्ता यांना न्याय देण्याचे आश्वासन व पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन, धाराशिव जिल्हा रिपब्लिकन नेते रवी माळाळे यांनी दिनांक 29 जुलै रोजी लोहारा, मार्डी, करजखेडा या ठिकाणी केले. कार्यकर्तेच्या समस्या जाणुन घेऊन विचार मंथन करण्यात आले.
याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले रो. आ जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव यांनी
तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन,त्यांच्या हक्कासाठी लढणारे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय रवी माळाळे साहेब हेच आहेत.त्यांच्या पाठीशी माझ्यासह पुर्ण लोहारा उमरगा तालुक्यातील सर्व रिपब्लिकन कार्यकर्ते असणार आहेत, असे आश्वासन देऊन जिल्ह्यात केलेल्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले.
याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष पोपट लांडगे साहेब, रो. आ आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, लोहारा तालुका अध्यक्ष दिगंबर कांबळे साहेब,लोहारा तालुका सरचिटणीस युवक बालाजी माटे, तालुका सरचिटणीस शुक्राचार्य थोरात,जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब भांडारे,जिल्हा उपाध्यक्ष तथा तोंरबा गावचे सरपंच शरद मस्के, लोहारा तालुका कार्याध्यक्ष सर्जीराव बनसोडे, ज्ञानोबा ( माऊली ) भालेराव लोहारा,सागर माळाळे,गिरीष माळाळे तालुका सचिव, तालुका रिपाइं जेष्ठ नेते कलाप्पा दुपारगुडे, मराठा आघाडी तालुकाध्यक्ष तुकाराम कदम,मातंग आघाडी तालुकाध्यक्ष सागर वाघमारे, वंडरगांव शाखा अध्यक्ष किरण वाघमारे, मनोज दादा जरांगे पाटिल समर्थक अमोल सुरवसे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिग्गज जनता न्युज.

132
2646 views

Comment