logo

सोमेश्वर देवस्थान श्रावण यात्रेसाठी सज्ज ‌

सोमेश्वरनगर, करंजे
सालाबादप्रमाणे सोमेश्वर देवस्थान यात्रेसाठी सज्ज झाले आहे.
श्रावण यात्रा सोमवार दिनांक ५/८/२०२४ ते मंगळवार दिनांक ३/९/२०२४ या कालावधीत आहे.
बाहेर गावावरुन येणारे भाविक तसेच स्थानिक सोमेश्वरनगरातील भाविक खूप मोठ्या संख्येने देवदर्शन घेण्यासाठी येत असतात.त्याच बरोबर ते आपली वाहने घेवुन येत असतात.त्यांच्या वाहन पार्किंग चा लिलाव होणार असुन तो लिलाव गुरुवार दिनांक १/८/२०२४ रोज सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असुन संबंधित इच्छुकांनी सोमेश्वर ट्रस्ट ऑफिस मध्ये ५०० रुपये जमा करून लिलावात भाग घेवुन शकता.जमा केलेली रक्कम परत मिळणार नाही.तसेच लिलावात जाहीर बोली रोख रक्कम सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट ऑफिस मध्ये जमा करणे बंधनकारक आहे. तरी इच्छुक मंडळींनी याची नोंद घ्यावी.
अशी विनंती सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आली आहे.





122
14397 views