logo

खापर येथिल मालतीबाई चित्रकथी कनिष्ठ महाविद्यालयात आदिवासी दिवस साजरा

✒️
प्रतिनिधी/नंदुरबार

खापर येथिल आईसाहेब मालतीबाई चित्रकथी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष जगदिश चित्रकथी उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी प्राचार्य विजयता कोळी होते.यावेळी आदिवासी क्रांतिवीरांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
यावेळी जगदीश चित्रकथी यांनी आदिवासी क्रांतिवीरांचे कार्य व आदिवासी संस्कृती चे महत्व आपल्या (आदिवासी) भाषणातून विशद केले. तर प्राचार्य विजयता कोळी यांनी क्रांतिवीरांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी बोध घ्यावा असे आवाहन केले.कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधानकरून विविध कला गुणांचे प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गंगा वळवी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.प्रशांत पाठक यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिपीक मयूर वाडीले,सर्फराज बलोच,लखन कोळी यांनी परिश्रम घेतले.

फोटो-खापर येथिल मालतीबाई चित्रकथी कनिष्ठ महाविद्यालयात आदिवासी दिवस साजरा करतांना संस्थेचे अध्यक्ष जगदीश चित्रकथी,प्राचार्य विजयता कोळी,शिक्षक,विद्यार्थी आदीं.

26
3455 views