
खापर येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा ; पारंपारिक पोशाख वाद्यसह मिरवणूक
✒️
"आमु बाठा आदिवासी"
प्रतिनिधी/नंदुरबार
जागतिक आदिवासी दिन शुक्रवारी अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे अपूर्व उत्साहात साजरा झाला.समस्त आदिवासी समाज गावकरी,क्रांतीदल खापरच्या मिरवणुकीस प्रचंड प्रतिसाद लाभला.बिरसा मुंडा चौक पासून बस स्थानक ते पुढे कोराई चाररस्ता होत बिरसा मुंडा चौक खापर येथे निघालेल्या मिरवणुक मध्ये प्रचंड उत्साह ओथंबून वाहत होता. याहा मोगी माता व बिरसा मुंडा यांना अभिवादन करून ही मिरवणूक खापर ते कोराई करत खापर येथे येऊन पोचली.महिला, पुरुष, तरुण-तरुणी आपल्या पारंपरिक वेशात मिरवणुकीत ढोलाच्या तालावर ठेका धरत होते. अग्रभागी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
अक्कलकुवा तालुक्यातील खापरगावाची विविध क्षेत्रात शांतीप्रिय,अग्रेसर अशी सर्वत्र छवी आहे,त्याचेच एक उदाहरण म्हणजे ९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आलेला जागतिक आदिवासी गौरव दिवस.या कार्यक्रमात खापरसह कोराई,ब्राह्मणगाव,आमलीफळी, कौलीसह इतर गावपाड्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.कार्यक्रमात गावांतील विविध क्षेत्रातील मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते, राजनेते,शिक्षक,नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन खापर येथील समस्त आदिवासी समाज गावकरी,क्रांतीदल खापरच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम शिस्तबद्ध पार पडला असून यासाठी चौख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
चौकट-
जागतिक आदिवासी दिन नृत्याविष्काराने साजरा
आदिवासी समाज मागासलेला असेलही मात्र याच आदिवासींच्या संस्कृतीला निसर्गाचा आणि मातीचा सुगंध आहे. निसर्गाशी आदिवासी समाजाची नाळ जुळली आहे. त्यामुळे आदिवासी संस्कृतीवर निसर्गाचा मोठा प्रभाव दिसून येतो. दुर्गम, डोंगराळ व जंगलमय प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाकडे लक्ष वेधण्यासाठी युनोने ९ आगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले आहे. संपूर्ण देशासह आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला.
फोटो-खापर येथे जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त निघालेली मिरवणूक शोभायात्रा. तर दुसऱ्या छायाचित्रात शोभायात्रेत आदिवासी वेशभूषा धारण केलेली चिमुकली.