
बदलापूर चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यांना तात्काळ फाशीवर द्या..शहरातील रोड रोमीओचा बंदोबस्त करावा...
नांदेड/प्रतिनिधी :- बदलापूर जिल्हा ठाणे येथील आदर्श विद्या मंदिरात शिक्षण घेणारी चार वर्षीय चिमुरडीवर शाळेतील सफाईगारांनी लैंगिक अत्याचार केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजले आहे.एका लहान निरागस बालिकेवर अशा पद्धतीने अत्याचार जर होत असेल, तर या पुरोगामी महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल.तसेच चाकूर जिल्हा लातूर येथे सुद्धा साडेचार वर्षाचा बालकेवर सुद्धा लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.मौजे काजीखेड तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथील माध्यमिक जिल्हा परिषद येथे शिक्षण घेणारे इयत्ता आठवी वर्गात असणारी मुलींला अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचाराचा प्रयत्न केला गेला आहे.अत्याचार करण्याचा प्रयत्न नराधम शिक्षक प्रमोद सरदार यांनी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.या वाढत्या घटनांमुळे शहरासह तालुक्यात लहान मुलींवर व शालेय युवती,मुलींना शाळेत व शिकवणी वर्गाकडे कसे पाठवावे?अशी चिंता पालक वर्गांना वाटत असल्याने, वाढत्या घटनेवरुन मुलींचे कुटुंब भयभीत झालेआहे.दिवसेंदिवस महिला,युवती व लहान बालिकेवर मोठ्या प्रमाणात अन्याय,अत्याचार वाढतआहेत.यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता भयभीत झालेली आहे. महाराष्ट्र राज्य कायद्याचे राज्य आहे की नाही?अशी भावना निर्माण झाली आहे.अत्याचार प्रकरणातील दोषीं नराधमाला कठोरातील कठोर फाशीची शिक्षा अतिजलद न्यायालयात प्रकरण चालवुन त्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी. अशी मागणी तालुक्यातुन आता समोर येत आहे.तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातुन शिक्षण घेण्यासाठी मुलीं,युवती शहरात येतआहेत. शहरातील परमेश्वर मंदिर देवस्थान परिसरात आणि हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय, राजा भगीरथ विद्यालय,शासकीय आयटीआय परिसर, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा या ठिकाणी शाळा सुरु होताना व शाळा सुटल्यानंतर रस्त्यावर पोलीस स्टेशन कडून कडक बंदोबस्त लावून, रोडवर टवाळखोरी करणाऱ्या मुलांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यामुळे मुलीच्यां छेडछाडी, अत्याचार प्रकरणावरआळा बसेल,याची तातडीने दक्षता घेण्यात यावी.अशी मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर व पोलीस निरीक्षक अमोल भगत हिमायतनगरकडे ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गुपतवाड, श्रीदत्त पवार सोनारीकर,विलास वानखेडे, संजय माने,पत्रकार धोंडोपंत बनसोडे, अँड ज्ञानेश्वर पंदलवाड,निलेश चटणे, पंडितअण्णा ढोणे,भानुदास पोपुलवाड ,शिरफुले पाटील, जाधव, वामनराव मिराशे सह अनेक सामाजिक,राजकीय तसेच विविध गावातील नागरिक,युवक यांनी निवेदन देऊन मागणी केलेलीआहे.यावेळी तहसीलदार मॅडम यांनी याविषयी तातडीने पोलीस प्रशासनाकडे निवेदन पाठवुन उचित कारवाई करण्यात येईल,असेही आश्वासन यावेळी शिष्टमंडळास देण्यात आलेआहे.