logo

श्री महावीर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची शालेय वेटलिफ्टिंगसाठी विभागस्तरावर निवळ .

शहादा : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे शालेय जिल्हास्तरीयटिंग स्पर्धा संपन्न झाली.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना पाटील मॅडम होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम के पटेल सर, वेटलिफ्टिंग खेळाचे विद्यापीठ खेळाडू निलेश ढोले, विद्यालयाचे क्रीडा संचालक प्राध्यापक डॉक्टर अरविंद कांबळे सर, स्पर्धा संयोजक जितेंद्र माळी सर घनश्याम चौधरी, सुनील गुरखा इत्यादी उपस्थित होते.
या स्पर्धेत श्री महावीर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वजन गटात यश संपादन केले. यात सिद्धी पाटील,तेजस्विनी सूर्यवंशी, मोक्षिता आव्हाड, राजश्री मोरे, दिव्या वाडीले या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविले. तसेच बुलबुल जांगिड,माही पाटील या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविले अदिती साठे या विद्यार्थिनी तृतीय क्रमांक पटकविले.प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड विभाग स्तरावर करण्यात आले आहे.

0
5736 views