logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

खडकपूर्णा प्रकलपातून अवैध रित्या सुरू असलेल्या रेती तस्करी विरोधात इसरूळ येथे सुरू असलेल्या उपोषणाचा आज दूसरा दिवस

बुलढाणा .खडकपूर्णा नदी पात्रातून राजेरोसपणे सुरू असलेली वाळू तस्करी रोखा ,रेती उपसा करणाऱ्या बोटी नष्ट करा,अन्यथा हा रेती उपसा अधिकृत करा ,जेणे करून लोकांना स्वस्तात शासकीय दरात वाळू मिळेल ,शासनाची गौणखनिज चोरी थांबेल आणि विना नंबर चे टिप्पर लोकांच्या जिवावर उठले आहेत, ते अपघात तरी टळतील लोकांचे जीव वाचतील…. ह्या सर्व रास्त मागण्या घेऊन आमचा लढा सुरू असताना सुद्धा आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले त्याचे काय या मागणीसाठी इसरुळ येतील माजी सरपंच संतोष भुतेकर व मंडप गावचे सरपंच सचिन कदम यांनी काल 28 ऑगस्ट 2024 पासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे 11 ऑगस्ट2024 रोजी निवेदन दिले असताना अजून सुद्धा शासनाचे कुठलेच पत्र त्यांना समजुती साठी किंवा प्रशासनाची भूमिका काय हे सांगण्यासाठी आले नाही आज मंडळ अधिकारी यांनी उपोषण तळी भेट देऊन निरोप पोहोचवला की आमच्या कारवाया सुरू आहेत आम्ही पथक नेमलेले आहेत परंतु खरंच पथकाच्या कार्यवाया मनापासून सुरू आहे का आणि पथक जर नियमित गस्तीवर आहे तर मग गाड्या चालतात कशा याचा अर्थ पथक पैसे घेऊन गाड्या सोडते असा नाही का होत पथक नेमून अवैध रेतीवर आळा घालण्यापेक्षा खडकपूर्णा प्रकल्पासाठी स्वतंत्र कार्यालय आहे मुख्य कार्यकारी अभियंता म्हणून क्लासवन अधिकारी त्या ठिकाणी आहे जे शेतकरी धरणामध्ये अतिरिक्त मोटर पंप सुद्धा शेतकऱ्यांना चालू देत नाही लोकांना एक मच्छी सुद्धा पकडू देत नाही अनेकदा लोकांचे वायर कापून नेले स्टार्टर काढून नेले मोटर पाण्यात लोटून दिल्या इसरूळ मध्ये मच्छी चोरतात म्हणून गुन्हे दाखल केले मंग 20 20 बोटी जर धरणात अवैध रेती उपसा करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करत का नाही असा प्रश्न शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला,
आज या उपोषणाचा दूसरा दिवस असून या दोन्ही उपोषण कर्त्यांची तब्बेत खालावली आहे तरी सुद्धा महसूल प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.

177
2951 views

Comment