logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

उल्हास नदी प्रदुषण मुक्तीसाठी माजी नगरसेवकाचे अनोखे आंदोलन

कल्याण : उल्हास नदी प्रदुषण मुक्त करण्याच्या कामामध्ये शासन आणि प्रशासनाकडून होत असलेल्या हलगर्जीपणाविरोधात माजी नगरसेवकाकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. स्वत:च्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'मी कल्याणकर सामाजिक संस्था' चे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नितीन निकम यांनी चक्क उल्हास नदीमध्ये १२ तास उभे राहून आंदोलन केले. विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान निकम पाण्याचा एकही घोट प्यायले नाहीत. यावेळी त्यांच्या सोबत माजी नगरसेवक उमेश
बोरगावकर आणि कैलास शिंदे देखील आंदोलनात सहभागी झाले होते.
कल्याण-डोंबिवली मधील लाखो लोकांची तहान उल्हास नदीतील पाण्यानेच भागवली जाते. कल्याण-डोंबिवली गणाधी तहरी उल्हास नदी ही
महापालिका प्रशासनाकडून या नदीतून पाणी उचलून मग शहरातील नागरिकांना त्याचा पुरवठा केला जातो. परंतु, ठिकठिकाणी उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदुषण झाले आहे. काही ठिकाणी नाल्याचे तर
काही ठिकाणी केमिकलचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीमध्ये सोडले जात आहे. परिणामी, उल्हास नदी प्रदुषित झाली असून त्यावर कायमस्वरुपी उपाय योजनेच्या मागणीसाठी नितीन निकम गेल्या अनेक वर्षांपासून विविध मार्गाने आंदोलन करत आहेत. परंतु, त्यानंतरही शासन- प्रशासन याबाबत
कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने लाखो लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याने आंदोलनाच्या माध्यमातून शासन - प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे नितीन निकम

155
158 views

Comment