logo

वसमत येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न..

वसमत तालुक्यातील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात आज मराठवाडा मुक्ति संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय सैन्यात कर्तव्य बजावलेल्या माजी सैनिकांच्या हस्ते ध्वाजारोहण पार पडले यावेळी श्री उत्तमराव बापूराव शिंदे(सुभेदार,२६युनिट मराठा), श्री अंकुश रामाप्पा पटवे (EMA हैद्राबाद),श्री बालाजी कोंडीबा नरवाडे(J.K.सियाचीन, देहरादून,मसुरी,लडाख,मेघालय), श्री केशवराव नारायणराव रापतवार(सुभेदार,मेजर दिल्ली, सिकंदराबाद ),श्री अंबादास पुरभाजी नरवाडे(सुभेदार,दिल्ली)श्री सखाराम दत्ताराम गारोडे(नायक,ड्रायव्हर,श्रीनगर, चंडीगढ,राजस्थान), एकनाथ महाजनराव डाखोरे (हवालदार,१७मराठा१९७१, वसमत मराठा रेजिमेंट,बांगलादेश युद्ध, अंबाला,पठाणकोट,चीन,भूतान, ग्वालियर,सिकंदराबाद,श्रीलंका) यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज,सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ, हुतात्मा बहिर्जी शिंदे, यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून माजी सैनिकांच्या, व शाळेच्या संचालक मंडळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले.
यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी भाषानातून, सामूहिक गीत गायनातून मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यामध्ये इंग्रजांविरुद्ध दिलेला लढा, वीरमरण पत्करणार्‍या हुतात्माच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले.
आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७रोजी स्वतंत्र झाला पण खर्‍या अर्थाने आपल्याला १७ सप्टेंबर १९४८ ला स्वातंत्र मिळाले आहे.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि तो भारताचा एक भाग बनला.
ही निजामकालीन सत्ता संपवण्यासाठी थोर हुतात्मे स्वामी रामानंद तीर्थ, हुतात्मा बहिर्जी शिंदे अशा अनेक थोर हुतात्मे आपल्या जिवाची पर्वा न करता रझाककाराशी लढून आपल्याला स्वातंत्र प्राप्त करून दिले आहे असे माजी सैनिक शिंदे साहेब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना विषयी सखोल अशी माहिती दिली.
यावेळी उपस्थित शाळेचे अध्यक्ष श्री संदीप चव्हाण,श्री बालाजी चव्हाण,श्री जगदीश चव्हाण, प्रिन्सिपल प्रमोद डोंबे, समन्वयक श्री संदीप चाटोरीकर,श्री आसाराम दुधाटे यासह शाळेतील सर्व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सईम पिराजी यांनी केले..

73
7529 views