logo

राष्ट्रवादी कॉग्रेस (श.प.) पक्षाच्या अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी गुलाब मुलाणी यांची निवड .... खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याहस्ते निवडीचे पत्र प्रदान .....


अकलूज :- राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी पंढरपुर तालुक्यातील कोर्टी येथील गुलाब मुलाणी यांची निवड करण्यात आली आहे.या विभागाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष जाकीर शेख यांनी या निवडीची घोषणा केली असून खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते गुलाब मुलाणी या निवडीबाबतचे पत्र प्रदान करण्यात आले.
गुलाब मुलाणी यांनी यापूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेस अल्पसंख्याक विभागाचे पंढरपुर तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.कट्टर मोहिते पाटील समर्थक अशी त्यांची ओळख असून पक्षाचे ध्येयधोरणे जनतेपर्यंत आणखी पोहिचविण्यात गुलाब मुलाणी हे समर्पक भूमिका पार पडतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.            यावेळी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रवी पाटील,मा.जि.प.सदस्य वसंत देशमुख,युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,दीपक वाडदेकर,ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा माळी,पंढरपुर तालुकाध्यक्ष संदीप मांडवे,मा.शहर अध्यक्ष सुधीर भोसले,जिल्हा संघटक रशीद मुलाणी मा.ग्रा.प.सदस्य सतीश देशमुख,विद्यार्थी सेलचे जिल्हध्यक्ष सागर पडगळ,युवक तालुका कार्याध्यक्ष धीरज डांगे आदी उपस्थित होते.

124
3169 views
1 comment  
  • Babasaheb Dharma Janrao

    Thanks